Featured Image

प्रिय किशोर कुमार

प्रिय किशोर कुमार, खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार? तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही तेवढच हळवं होतं. तू रात्र रात्र गप्पा मारणाऱ्या आम्हा चार पाच जणात कॉमन… Read more »

Featured Image

प्रिय मम्मी पप्पा 

प्रिय मम्मी पप्पा आज फर्स्ट टाईम तुम्हाला लेटर लिहितोय. तेही मराठीत. actuallly तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची पण habit लावली नाही. मम्मा आणि पप्पा बोलायला शिकवलं. मी तेच म्हणतो. तरी ममा तू शेजारच्या आंटीला कम्प्लेंट करत होतीस की आजकालच्या मुलांना मराठी नीट येत नाही. माझी मिस्टेक काय हेच मला कळत नाही. तुम्ही जे शिकवलं… Read more »

Featured Image

माधुरी दीक्षित

प्रिय माधुरी, तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. पण लग्न करायचं तर माधुरीशी हे मात्र मी तेंव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या वाटेवर वडाचं झाड होतं. आम्ही पाच सहा मित्र त्या झाडाच्या अंगाखांद्यावर वाढलो. शाळा सुटली रे सुटली की आम्ही त्या झाडावर… Read more »