प्रिय मराठी नट नट्या हो …

गणू  मुकादमचा नमस्कार. तशे आमच्या गावाकडचे लोक नेत्या कडून जास्त अपेक्षा ठीवतेत. पण मी सिनेमाचा रसिक असल्या मूळ मी अभिनेत्य कडून काय अपेक्षा हायेत त्या सांगतो. 

 मी शिनेमाचा पहिल्या पासून रशिक. म्हणजे अमिताभ आन रेखाच्या बाबतीत 

जया बच्चन ला डाऊट यायच्या आधी मला लक्षात आल होतंकाही तरी झेंगट आहे. कारण मी तेवढा डिटेल मधीच पाहतो शिनेमा. त्याच्या मूळ मला पडद्याच्या मागच्या भानगडी चा लगीच अंदाज येतो. 

पण मी काय म्हणतो मराठी नट नट्याहो, मी तुम्हाला पत्र लिहितानी बी मला हिंदी इंडस्ट्री चीच चर्चा कराव लागती हीभानगड आली का तुमच्या लक्षात? ह्याला काय कारण आसल?  सोप्पय. तुमचा आळशी पणा. तुम्ही सिनेमात काम करायच्या पलिकड काही करीतच नाही ना. काही गॉसीप म्हणा…काही भानगड म्हणा..काही लफड म्हणा…तुम्ही लोक ह्या गोष्टी मन लावून करीतच नाही राव. मग आमच्या सारख्याची तरी कशी उत्सुकता वाढनआता शिनेमा चालायचा म्हणजे जीव लावूनमेहनत घेतली पाहिजे नानिदान तुम्ही लोकांनी तरी. पण तुम्ही लयीच पांढरपेश्यावाणी वागता राव. आता महाभारतात सगळेचसज्जन असते त कुणीतरी महाभारत पाहिलं असत कारावणानीसीतेला पळवून नेल्या मूळ ड्रामा वाढला. आता ह्या ड्रामा वाढवायच्या गोष्टी बी मी सांगायला पाहिजे का राव

      आन मला सांगा हिंदी नट काय कमी काम  करतेतपण तरी बी गॉसीप चालूच असत. ह्यांनी तिच्या शी लफड केल. तिनीह्याला सोडल. प्रियांका चोप्राचं कुणाशी ना कुणाशी तरी नाव जोडलं जात.शिनेमाच्या पुरवण्या चालविण्यात किती महत्वाच योगदान देत्यात त्या नट्या. आपल्याकड त्याबाबतीत सगळा अंधारचय. म्हणून आपल्याकड फार फार त काय गॉसीप होतती नटी आज वेगळ्या गाण्या वर नाचली. आता हि काय बातमीय काआन आम्हाला काय पाहिजे दुसरमराठीत आसल काही चविष्ट घडतच नाही राव. कवा बघा. नट नट्या मुलाखतीत सारखच बोलतेत. मी ह्या भुमिके साठी एवढी मेहनत घेतली. मी हे वेगळ केल. मी ते वेगळ केल. आता वेगळेपणा बद्दल एवढ बोलत बसल्या वर ते वेगळेपण तरी कस वेगळ वाटन बरजो नट उठतो तो म्हणतो आमचा सिनेमा वेगळाय. आता वर्षाला शंभर पिक्चर निघतेत. मंग प्रत्येक शिनेमा वेगळा कसा आसल? आन मी काय म्हणतो शिनेमा नाही पण निदान त्यो कसा वेगळाय हे तरी जरा वेगळ्या पद्धतीनी सांगा राव. तुमचं बोलणं आता लयी रुटीन वाटू लागल.. कंटाळा याय लागला.

नट  भुमिके साठी काय  मेहनत घेतो ह्याच्या शी आम्हाला काय करायचं बरतुझ कामय बाबा. तू केलच  पाहिजे. आम्ही सांगत बसतो का आम्ही मोसंबीचा बाग कसा जीवापाड जपलाकापूस कसा मेहनतीनी येचला. म्हशी ला कसा लांबून लांबून  चारा आणलाआपल कामय. आपुन करतोच. तेच लोकाला सांगत सुटलो त गावात कुणी ऐकण का आमचपण जर गावात कुणाचं कुणाशी सुत जमलंय आसा निस्ता विषय काढला तरी हातातलं काम सोडून माणस गोळा होतेन. आता एवढी साधी आयडिया जर तुम्हाला कळत नसन त मराठी सिनेमाला चांगले दिवस यायचे स्वप्न सोडून द्या.  जिथ दिवस याय जायचा संबध आसतो तिथ थोडा रोमान्स पाहिजे हे बी आम्ही सांगायचं म्हणजे लयी झाल राव आता. 

किती दिवस आम्ही नटा च्या अभिनयाची चर्चा करायचीआम्ही काय फिल्म फेष्टीवल वाले रिकामे लोकयत काआम्हाला काम धंदे आस्तेत. आम्ही संदेश काय दिला हे बघत नाही. शंभर दोनशे रुपये घालून आम्ही संदेश ऐकायला येत नाही. ते आजकाल फुकट भेटतेत whats app वर. जरा काही भांडण – लफडे आसल काही चमचमीत आसल त मजा येती. खूप माणसं ठरवून पण मारामारी करू शकत नाही म्हणून पडद्यावर पाहून हौस भागवतेत. आन तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो. एखादं गाणं आवडल त आम्ही डायरेक्ट वाजवितो. त्याचं रसग्रहण करीत बसत नाही.खरंतर रसग्रहण मला आधी उसाच्या बाबतीत काही आसल आस वाटलं होतं. पण ते सिनेमाचं आसत म्हणले. मराठी सिनेमाच्या बाबतीत भाषा बी लई अवघड. परीक्षण, चित्रीकरण, सौंदर्य दृष्टी. आपल्या डोक्यात येत नाही राव. काय त म्हणे ही जागा बेला शेंडे नि काय भारी घेतली आन ती जागा शंकर महादेवन नि  काय भारी घेतली. हे ऐकलं की आमचे बापू म्हनतेत बेला शेंडेनी काय एक्कर घेतली म्हणले जागा ?’

त्याच्या मूळ सरळ साध्या गोष्टी आमच्या  पर्यंत पोचत्यान हे बघा. नटाची बॉडी बिडी आपल्याला काही इंटरेस्ट घेण्या सारखी वाटत नाही. कारण पुरुष उघडा बघायचा त तो आरश्या समोर...म्हणजे आपल आपल्यालाच बघायचं हीआमची सवय. त्याच्यामुळ सिक्स प्याक आसो नाही त टेन…आपल्याला फरक पडत नाही.आपली साधी अपेक्षा काय आस्ति त ह्या नट लोकांनी काही मसालेदार बोलाव. सलमान पहा बर कसा शाहरुख बद्दल वाटलं ते बोलतो. पण आपल्या कड कुणी आस मन मोकळ करीतच नाही. त्याच्या मूळ मराठी इंडस्ट्री माग पडलीय आस माझ फार अभ्यास नंतर बनलेलं मत आहे. आन माझ्या मताला गावात खूप किंमतय. तर माझ म्हणणं एकदम साधय. उगच आपुन लायी अभ्यासू असल्याचा आव आणीत मुलाखती देण्या पेक्षा चार भांडण, लफडे जगाला कळू द्या. म्हणजे गावो गाव चर्चा होती.कारण कुणाच कुणा बरोबरय हा आपल्याकड संशोधनाचा विषय झालाय.त्यो आवडीचा विषय झाला पाहिजे. निस्ती सलमान सारखी तब्येत वाढवून काही फायदा नाही. धाडस पण लागतं. तरच लोकांना हिरो हा आपल्या पेक्षा भारी आसतो ह्या गोष्टी वर विश्वास बसतो. नाही त हिरो सुद्धा बायको च्याच सोबत येतोय सिनेमाला आन पब्लिक सुद्धा. काय मजा येईल लोकाला सांगा बरं? मंग आम्हाला वाटत आरे हे त आपल्या सारखचंय राव. आन ह्याला पाहायला कशायला १०० रुपये घाला?

 त माझ जाहीर आवाहन आहे. उगच सज्जन होऊन मराठी सिनेमाला वाईट दिवस आणू नका. नवी पिढी  आजकाल देवाला जातानीबी  ज्या देवळात चांगल्या पोरी येतात तिथ जाती. उगच वेळ वाया घालवीत नाही. त्याच्या मूळ तरुण मनाला उत्साह वाटण आस काही तरी करा. उगच मराठी सिनेमा बघितला पाहिजे अस  भाषण देऊन हाये नाही तेवढे प्रेक्षक घालवू नका. जरा चटपटीतखमंग बोलत जा. एखाद्या पोरीत इंटरेस्ट आल्या शिवाय पोर शाळेत जात नाहीत आजकाल. आन हे म्हनतेत आमचा पिक्चर बघा. आरे बघू बाबा. पण जरा उरात धडधड व्हईल आस करा ना राव काहीतरी.

मायला म्हातारे कोतारे उला ला कराय लागले होते मागं त्या विद्या बालन च्या नावानी. मी म्हणतो नको विद्या बालन. आम्हाला कुणी बी चालन. पण उला ला झाल पाहिजे राव.आशी मनातून शिट्टी माराव आसं काहीतरी पडद्यावर झालं पाहिजे. 

त मंडळी माझ्या मनात जेवढे उपाय आले तेवढ मी सांगितले. आता पटले आस्तेन त राहू द्या. नाही त सोडून द्या. मराठी सिनेमा बद्दल कुणीबी उठून बोललं तरी खपून जात म्हणून मी बी बोलून टाकलो. 

बरं काही हिरो म्हनतेत आम्हाला कामातून येळच मिळत नाही. आरे तुम्हाला काय नांगर हाणायचा का? साधी गोष्टय राव. लोकांना स्वच्छता शिकवायची आसल, व्यसनमुक्ती बद्दल सांगायचं आसल नाहीत झाडं लावायला सांगायचं आसल त तुमच्या तोंडून संदेश देतेत. आता कुठ्ल्याबी विषयावर जनतेला शिकविणारे तुम्ही आन आम्ही तुम्हाला ह्या साध्या साध्या गोष्टी शिकवायच्या का? बरं तुम्ही म्हणतान आम्ही तुम्हाला शिकवणारे कोण? त बाबाहो तुम्ही जाहिरातीत आम्हाला बियाणं कोणचं वापरायचं हे बी शिकविता आन फवारणी कोणची करायची हे बी सांगता. आम्ही काही बोलतो का? मंग आम्ही तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं काही सांगितलं त काय फरक पडतो? 

आसो. तुम्ही मराठी शिनेमात किती दिवस राहतान माहित नाही. पण मराठी शिनेमा कायम पहात राहीन. शुभेच्छा!

तुमचाच 

गणू .

 

– अरविंद जगताप.

The following two tabs change content below.
अरविंद जगताप

अरविंद जगताप

Writer, Lyricist, And Curious About Everything at ArvindJagtap.com
Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of foolery, comedy, humor, political satire and pragmatism. Arvind has penned thought provoking articles on important issues such as farmers suicides, draught, life in rural Maharashtra, pseudo progress, urbanization and its social & ecological impact, to name a few. His work is a reflection of his ideology. It weighs in favor of generating awareness among the masses rather than simply creating pure nonchalant entertainment.
अरविंद जगताप

Written by अरविंद जगताप

Arvind Jagtap was born on 20th September 1977. He is a poet, lyricist and scriptwriter well-known for his exploits in Marathi Cinema, the Art and Literature circuit and Television Industry. He is also a voracious reader who has developed his own heart-touching and candid writing style which incorporates colors of...
Read more

Leave a Reply