aamdar

साहेब

दिप्या दहा वर्ष झाले साहेबांसोबत होता. साहेब म्हणजे पक्षाचे आमदार प्रकाश गोरे. साहेबांची प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होतेय का नाही हे पाहणं दिप्याचं काम. आधी तो साहेब गावात येऊन सभा घ्यायचे त्या सभेला हजर असायचा. त्यांच्या गाडीमागं गावाच्या बाहेरपर्यंत धावायचा. असाच धावत असताना एक दिवस तो पडला आणि त्याच्या दृष्टीने त्याचं नशीब उघडलं. साहेबांच्या लक्षात… Read more »

happy new year

प्रिय २०१८ 

प्रिय २०१८ हे नववर्षा! तुझं स्वागत आहे. खरंतर नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करायला हवा. पण आम्ही सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करणारी माणसं. जुन्या वर्षाला निरोप देता देता एवढा उशीर होतो की नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय बघायचा राहून जातो कित्येकांचा. आणि काही काहींचा निरोप समारंभ थेट सुर्योदयापर्यंत रंगतो. पण सूर्याकडे पाहण्याची ताकद उरलेली नसते… Read more »

सोनामावशी

सोनामावशी पारगावला नांदायला आली त्यावर्षी पाच सहा वर्षांनी त्या भागात चांगला पाउस झाला. बायका तिला देवीच म्हणायच्या. सोनामावशी पण देवीची भक्त. दोन मुलं झाली. नवरा शेतात काम करत होता. साप चावला. दवाखाना लांब होता. वाचला नाही. दोन्ही पोरं सोनामावशीनी सांभाळली. शिकवली. मोठी केली. एकाचं नाव गणेश, दुसरा संदीप. बिन बापाचे लेकरं म्हणून गावातले लोक पण… Read more »

हिंसा

हिंसा …

  हिंसा या शब्दाचा आपण खूप एकांगी विचार करतो. कुणीतरी कुणावर तरी केलेला हल्ला आपल्याला हिंसा वाटते. कुणीतरी कुणाचातरी केलेला छळ आपल्याला हिंसा वाटते. पण माणसं स्वतः स्वतःलासुद्धा छळत असतातच की. त्यांचा विचार कुणी करायचा? आजी जे अतिरेकी उपवास करायची त्याचं मला कधीच कौतुक वाटलं नाही. तो तिने चालवलेला छळ होता स्वतःचा. पण तिच्या मनावर… Read more »

smartphone

स्मार्टफोन

विन्या अभ्यासात हुशार होता. बारावीत तालुक्यात पहिला आला होता. गावात सगळ्यांना त्याचं कौतुक होतं. विन्याचे वडील लोकांच्या शेतात मजुरी करायचे, कधी रसवंतीवर काम करायचे. विन्या आठवीत असतानाची गोष्ट. उन्हाळा होता. वडील रसवंतीवर कामाला होते. रसवंती हायवेला होती. एकदा एक बाईकवाला कारला धडकला. जोरात ब्रेकचा आवाज झाला. विन्याचे वडील घाबरून बघत राहिले. त्यांचा हात उसाच्या चक्रात गेला. भांड्यात… Read more »

दीपिकाचं नाक

दीपिका पडुकोणचा आणि उंदीरवाडीचा तसा काहीच संबंध नव्हता. राणी पद्मावतीचा तर अजिबात नाही. दीपिका पडुकोणला तरी लोकांनी पाहिलं होतं टीव्हीत. पण उंदीरवाडीत कुणाला राणी पद्मावतीविषयी काहीच माहित नव्हतं. पण आता गावातून थेट सरपंच निवडायची वेळ जवळ आली होती. सगळ्यांना आपण सरपंच होऊ शकतो असं वाटत होतं. आता छोट्या गावात सगळेच एकमेकांना राम राम घालतात. पण… Read more »

प्रिय इंडिया उर्फ भारत देशा

खरंतर तुझ्या नावापासूनच गोंधळ आहे माझा लहानपणापासून. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर इतर मुलांसारखा मी तुला वेगवेगळ्या नावाने बोलत आलोय. तुला हिंदुस्तान म्हणण्यात एकेकाळी केवढा आनंद व्हायचा. पण हिंदुस्तान हा शब्द नेमका कसा आला हे शोधता शोधता पार वाट लागली. किती वाद आहेत तुझ्या नावात सुद्धा. आपण बोलू तेच खरं, किंवा आपण वाचू तेच सत्य एवढा नेभळट… Read more »

विकासचं काय झालं?

शेवंता आणि भारतचा संसार कसाबसा कुरकुर करत चालू होता. तशी शेवंताला अडचण काही नव्हती. पैशाला कमी नव्हती. भारत वाटल तेवढे पैसे आणून द्यायचा. कधी काही बोलायचा नाही. शेतात राब राब राबायचा. शेवंता नोटा मोजायची. तरी भारतच्या नशिबात सुख नव्हतं. कारण वंशाला दिवा नव्हता. लोक भारतला नावं ठेवायचे. आधी आधी माघारी बोलायचे. पण नंतर नंतर तोंडावर… Read more »

अच्छे दिन!

मदनराव ७२ वर्षांचे होत आले होते. हे तसं फक्त त्यांनाच माहित होतं. दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या कामात. मोठा मुलगा सुदामसोबत राहतो. सकाळी नाश्त्याला बापासोबत असायचा. पण ग्राम पंचायतीवर निवडून आला आणि भेटायचाच बंद झाला. छोटा पुण्याला होता नौकरीला. कधी आला तर चार चौघात पाया पडायचा. बाकी फार बोलणं नाही. मदनराव बायको गेल्यापासून गुपचूप म्हातारे होत… Read more »

किस

जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं. पुढ एका राजकीय पक्षाच्या नादी लागला. जिल्हा प्रमुखाची सिगरेट आणून द्यायची, खुर्च्या आवरायच्या असे कामं करायचा. एक वर्षात त्याच्या लक्षात आलं की जिल्हा प्रमुखांनी सिगरेटचा ब्रांड बदलला पण आपल्या आयुष्यात काही बदल झाला नाही. पुन्हा… Read more »

Latest
  • नेमाडे – बेस्ट पोएट्री

    कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील? कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील? फांद्यांनी भर उन्हात होकार दिले असंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील? आणि मी परत सगळं मागेन ते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_ नुसतच मानेनं सगळं ते परत देशील? तुझी हार गोंदणारणीकडून तुझ्या हातावर गोंदून घेईन. – भालचंद्र नेमाडे.

  • गुलजार एक नज्म…

    गुलजार जिंदगी मे कई ऐसे दौर होते हैं  जब हम किसीकी नही सुनते… बचपन मे मां बापकी नही सुनते.. कॉलेज मे टीचरकी नही सुनते.. शादी के बाद बिवीकी  नही सुनते.. अब बच्चे भी टोकेंगे कभी  और हम उनकी भी नही सुनेंगे.. लेकीन जिंदगी मे ऐसा कोई दौर नही गुजरा जब उस शायर को नही सुना…. Read more »

  • Arvind Jagtap Letter To Dattu Bhoknal

    ऑलम्पिक मेडल

    असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई आहे. आपल्याकडे हजारो गावं अशी आहेत ज्यांनी पावसाची वाट पाहणं कधीच सोडून दिलंय. ते फक्त tanker चीच वाट बघत असतात. अशाच एका तळेगाव नावाच्या गावातला तरुण दत्तू भोकनल. नाशिक मधल्या चांदवडजवळचं गाव. वडील कुटुंब… Read more »