प्रिय सचिन

प्रिय सचिन खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा होती. पाकिस्तानचा अब्दुल कादिर तुला म्हणाला की नव्या बॉलरला काय मारतोस? मला मारून दाखव. आणि अब्दुल कादिरच्या पुढच्या ओव्हरमध्ये तू चार सिक्स… Read more »

गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.

गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.

ती – अहो काय चाललंय हे? तो – जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं मतदान चालू आहे. गेले चार महिने बोंबा मारताहेत सगळे. तरी तुम्ही विचारताय काय चाललंय हे… ती – तस नाही हो. पण माझं मतदार यादीत नावच नाही. तो – काय सांगता? कमाल आहे. ती – अहो जाताय कुठे? खरच नाव नाही माझं. तो –… Read more »

पाणी फाऊंडेशनची गोष्ट

प्रिय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या इतर अनेक गावासारख्याच एका गावाची ही गोष्ट. कधीकाळी आपल्या शेतातल्या भरघोस पिकावर पाखरं येऊ नयेत म्हणून बुजगावणं उभं करायचे लोक. पण गेल्या काही वर्षात गावात बुजगावणं सुद्धा नजरेस पडत नाही. माणसं निघून जातात दुसऱ्यांच्या शेतातला उस तोडायला. गावची वेस ओलांडून जायला फुरसत नव्हती एके काळी. आणि गेल्या काही वर्षात शेकडो किलोमीटर दूर… Read more »

पत्रास कारण की

पत्रास कारण की पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं आलं की किती आनंद व्हायचा.लहानपणी खूप नातेवाईकांना, शेजार्यांना पत्र लिहून द्यायचो. आता चला हवा येऊ द्या मध्ये पत्र लिहितो. खरंतर एक पत्र लिहून बघू म्हणून सुरुवात झाली होती. पण हळू हळू चला हवा येऊ द्या मध्ये सारखं पत्र… Read more »

बोलतो मराठी..?

मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. २७ फेब्रुवारी. एक दिवस आधी म्हणजे २६ फेब्रुवारीला असते सावरकरांची पुण्यतिथी. मराठी भाषेला शेकडो पर्यायी शब्द तयार करून देणारे सावरकर. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी मनामनात रुजवलेली आपली मराठी भाषा. आज एवढ्या वर्षानंतरही तुकारामांचं एकतरी वाक्य लोक रोज बोलतात. कळत नकळत. मराठी भाषा टिकली… Read more »

हिरो व्हायचंय का?

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतं. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय असं सांगत असले तरी खूप लोक मनातल्या मनात स्वतःला शाहरुख किंवा करीना कपूरच्या जागी बघत असतात. गाणी कानाने ऐकत असतात. मनात मात्र स्वतः पडद्यावर नाचत असतात. यात चूक काहीच नाही. प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे. पण या हिरो होण्याच्या नादात हजारो… Read more »

मी आनंदीबाई जोशी

सप्रेम नमस्कार! मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेंव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना माझ्यासारखे बरेच लोक लक्षात आहेत अजून तुमच्या. पण खर सांगू? मला तुम्ही जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा माझी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीत तर आवडेल मला. दीडशे वर्ष होत… Read more »

तु हि रे

चित्रपट लिहिता लिहिता किंवा या क्षेत्रात काम करता करता एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला या क्षेत्रात अजून खूप काही शिकावं लागेल. कारण हे वेगाने बदलत जाणारं माध्यम आहे. नव्या पिढीची भाषा वेगात बदलतेय. जुन्या चित्रपटांचे संवाद आणि आजच्या चित्रपटांचे संवाद यात किती फरक पडलाय ते आपण बघतोच. लेखक म्हणून सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे…. Read more »

भेटलं पाहिजे !

                 लेखक असा विषय आला की पुस्तक आपसूक आलंच. नवे लेखक जुन्या लेखकांना काय वाचायला हवं ते विचारत राहणार. पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, समीक्षा, गटबाजी असं सगळं चालू. पण मुळात लेखकासाठी हे पुरेसं असतं का? खरंतर खूप महत्वाची पुस्तकं आयुष्यात पहिल्यांदाच लिखाण करणाऱ्या माणसांनी लिहिली. साहित्याचा, लेखनाचा कसलाही… Read more »

कोणता झेंडा घेऊ हाती?

लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो. कुठलीही गोष्ट घडली की त्याची कथा होऊ शकते का असा विचार येत असेल तर अवघड आहे. म्हणजे सीमेवर जवान शहीद झाला की आपल्याला जर लगेच कविता सुचत असेल तर काहीतरी चुकतंय. चिडचिड व्हायला सुरुवात होते, आपण अस्वस्थ होतो तोपर्यंत आपण माणसात आहोत असं समजायचं. खरंतर… Read more »

Latest
  • नाम फाउंडेशन

    सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे. कारण ते शेतकरी आहेत. सत्तावीस नक्षत्रं आहेत. त्यातले पावसाचे नऊ गेले तर त्यांच्या दृष्टीने शून्यच… Read more »

  • बेस्ट ऑफ गुलजार

      खयाल चलते है आगे आगे मै उनकी छांवमें चल रही हूं… न जाने किस मोमसे बनी हूं जो कतरा कतरा पिघल रही हुं मै सहमी रहती हूं नींदमें भी कही कोई ख्वाब डस न जाये….. मेरे सरहाने जलावो सपने मुझे जरासी तो नींद आये…. वादा मुझको इक नज्म का वादा है मिलेगी मुझको डूबती… Read more »

  • नेमाडे – बेस्ट पोएट्री

    कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील? कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील? फांद्यांनी भर उन्हात होकार दिले असंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील? आणि मी परत सगळं मागेन ते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_ नुसतच मानेनं सगळं ते परत देशील? तुझी हार गोंदणारणीकडून तुझ्या हातावर गोंदून घेईन. – भालचंद्र नेमाडे.

error: Content is protected !!