पत्रास कारण की

पत्रास कारण की पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं आलं की किती आनंद व्हायचा.लहानपणी खूप नातेवाईकांना, शेजार्यांना पत्र लिहून द्यायचो. आता चला हवा येऊ द्या मध्ये पत्र लिहितो. खरंतर एक पत्र लिहून बघू म्हणून सुरुवात झाली होती. पण हळू हळू चला हवा येऊ द्या मध्ये सारखं पत्र… Read more »

बोलतो मराठी..?

मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. २७ फेब्रुवारी. एक दिवस आधी म्हणजे २६ फेब्रुवारीला असते सावरकरांची पुण्यतिथी. मराठी भाषेला शेकडो पर्यायी शब्द तयार करून देणारे सावरकर. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी मनामनात रुजवलेली आपली मराठी भाषा. आज एवढ्या वर्षानंतरही तुकारामांचं एकतरी वाक्य लोक रोज बोलतात. कळत नकळत. मराठी भाषा टिकली… Read more »

हिरो व्हायचंय का?

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतं. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय असं सांगत असले तरी खूप लोक मनातल्या मनात स्वतःला शाहरुख किंवा करीना कपूरच्या जागी बघत असतात. गाणी कानाने ऐकत असतात. मनात मात्र स्वतः पडद्यावर नाचत असतात. यात चूक काहीच नाही. प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे. पण या हिरो होण्याच्या नादात हजारो… Read more »

मी आनंदीबाई जोशी

सप्रेम नमस्कार! मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेंव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना माझ्यासारखे बरेच लोक लक्षात आहेत अजून तुमच्या. पण खर सांगू? मला तुम्ही जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा माझी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीत तर आवडेल मला. दीडशे वर्ष होत… Read more »

तु हि रे

चित्रपट लिहिता लिहिता किंवा या क्षेत्रात काम करता करता एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला या क्षेत्रात अजून खूप काही शिकावं लागेल. कारण हे वेगाने बदलत जाणारं माध्यम आहे. नव्या पिढीची भाषा वेगात बदलतेय. जुन्या चित्रपटांचे संवाद आणि आजच्या चित्रपटांचे संवाद यात किती फरक पडलाय ते आपण बघतोच. लेखक म्हणून सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे…. Read more »

भेटलं पाहिजे !

                 लेखक असा विषय आला की पुस्तक आपसूक आलंच. नवे लेखक जुन्या लेखकांना काय वाचायला हवं ते विचारत राहणार. पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, समीक्षा, गटबाजी असं सगळं चालू. पण मुळात लेखकासाठी हे पुरेसं असतं का? खरंतर खूप महत्वाची पुस्तकं आयुष्यात पहिल्यांदाच लिखाण करणाऱ्या माणसांनी लिहिली. साहित्याचा, लेखनाचा कसलाही… Read more »

कोणता झेंडा घेऊ हाती?

लेखक वगैरे आपण नंतर असतो. आधी आपण सामान्य माणूस असतो. कुठलीही गोष्ट घडली की त्याची कथा होऊ शकते का असा विचार येत असेल तर अवघड आहे. म्हणजे सीमेवर जवान शहीद झाला की आपल्याला जर लगेच कविता सुचत असेल तर काहीतरी चुकतंय. चिडचिड व्हायला सुरुवात होते, आपण अस्वस्थ होतो तोपर्यंत आपण माणसात आहोत असं समजायचं. खरंतर… Read more »

गोष्ट छोटी डोंगराएवढी!

आपण लेखक कसे काय झालो? या प्रश्नाचं उत्तर कुणाला सहजा सहजी देता येत नाही. माझ्याबाबतीत तर लोक म्हणतात म्हणून आपण लेखक अशी परिस्थिती आहे. आपण लेखक आहोत असं आपण कसं समजायचं? केवळ कागद काळे करतो किंवा टायपिंग येते म्हणून? डॉक्टर, इंजिनियरला डिग्री मिळते आणि ठरतं की ते आता डॉक्टर किंवा इंजिनियर. लेखकांचं तसं नसतं. ते… Read more »

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा!

     खरंतर दहावी अकरावीत लिहायला लागलो तेंव्हा पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढच स्वप्न होतं. अजूनही वर्तमानपत्रात काही छापून आलं की भारी वाटतं. पाहिळ्यापासून पत्रकार व्हायचं स्वप्न होतं. ते काही होता आलं नाही. पण पत्रकारासारखं जगायची सवय लागली. फिरायचं, लोकांशी बोलायचं, वेगळा angle शोधायचा प्रयत्न करायचा. ही सवय तशी खूप कामी आली. सुरुवातीला मराठवाडा नावाच्या दैनिकासाठी लिहायचो… Read more »

प्रिय २०१९

प्रि­य २०१९ मला वाटलं येतं का नाही यंदा नवीन वर्ष? २०१८ तसं लईच लांबलचक गेलं. हनुमानाच्या शेपटीसारखं. हनुमान कोणत्या जातीचा ते काही अठरात समजलं नाही. आता एकोणीसमधीच कळल कायकी. एकोणीस आल्याव एकच टेन्शन आलं. आमच्याकड आर्धे दोस्त एकोनावीस म्हनतेत. त्यातले आर्धे आता पुण्यात आसतेत. त्यांचा आता वर्षभर पानउतारा व्हनार. आमचे मास्तरच एकोनावीस म्हणायचे त्याच्यामूळ आम्हाला… Read more »

Latest
  • सेल्फी

    सेल्फी

    नुकतीच एक बातमी आली. जागतिक पातळीवर एक सर्वेक्षण केलं गेलं. त्यात आपल्या देशाचा पहिला नंबर आला. आता पाहणी कशाची करण्यात आली ते बघा. मोबाईलवर सेल्फी काढायच्या नादात किती देशात किती लोकांना जीव गमवावा लागला याची पाहणी होती. त्यात सेल्फी काढण्याच्या नादात जगात सगळ्यात जास्त लोक भारतात मृत्यू पावले. आपला पहिला नंबर आला. आता काय म्हणणार?… Read more »

  • शेतकऱ्यांच्या अडचणी

    कोबडं, बोकड, गाय वगैरे….

    शंकर घाडगेची गोष्ट. तो एक प्रामाणिक माणूस आहे. शेती करतो. नवे नवे प्रयोग करत असतो. कधी भेंडी लावतो. कधी वांगे. बघता बघता त्याच्या प्रयोगाला गेल्या काही वर्षात चांगलीच डिमांड आली. चार पैसे गाठीशी झाले. चार दोन पेपरात नाव आलं. एकदा टीव्हीवर पण दाखवलं. गावात चर्चा सुरु झाली. आधी सरपंच शंकरला फार मोजत नव्हता पण आता… Read more »

  • नाना पाटेकर चला हवा येऊ द्या

    नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

    आज नाना पाटेकर यांचा वाढदिवस. खूप खूप शुभेच्छा! नामच्या त्यांच्या कामाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. हां वही बारीश वही बारीश जो आसमान से आती थी बुन्दों में गाती थी पहाडों से फिसलती थी नदीयों में चलती थी नहरों में मचलती थी ……. आजकल कहीं खो गयी है? या… Read more »

error: Content is protected !!