जय हिंद !

जय हिंद ! इंग्रजांनी जाहीर केलं १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य देणार. पण तेंव्हा आपले काही लोक म्हणाले म्हणे की तो दिवस अशुभ आहे. थोडं मागे पुढे करा. अशा प्रकारे नको त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झलक देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्याला दिसली. खरंतर स्वातंत्र्य मिळत असताना देशातल्या अनेक संस्थानिकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आपण एक राष्ट्र आहोत,… Read more »

प्रिय किशोर कुमार

प्रिय किशोर कुमार, खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार? तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही तेवढच हळवं होतं. तू रात्र रात्र गप्पा मारणाऱ्या आम्हा चार पाच जणात कॉमन… Read more »

प्रिय मम्मी पप्पा 

प्रिय मम्मी पप्पा आज फर्स्ट टाईम तुम्हाला लेटर लिहितोय. तेही मराठीत. actuallly तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची पण habit लावली नाही. मम्मा आणि पप्पा बोलायला शिकवलं. मी तेच म्हणतो. तरी ममा तू शेजारच्या आंटीला कम्प्लेंट करत होतीस की आजकालच्या मुलांना मराठी नीट येत नाही. माझी मिस्टेक काय हेच मला कळत नाही. तुम्ही जे शिकवलं… Read more »

father-and-son

आपल्या पिढीचे बाप…

आपल्या पिढीचे बाप… बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत. कारण कविता फालतू आहे असं चारचौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बापमाणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे जगलो गाव आणि शहरात आणि या सिनेमात प्रत्येक बापाचा रोल एकसारखाच लिहिलेला होता. पेपरात सातव्या पानावर आठव्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे, तो… Read more »

आपण महाराजांचे मावळे आहोत का?

आपण महाराजांचे मावळे आहोत का?                  आपण खूप कट्टर शिवभक्त असल्याचं सांगतो पण खरंच तसे आहोत का? आपण आपलं आपल्याला तपासून बघण्याची गरज निर्माण झालीय. शेतकऱ्याला संपावर जायची वेळ आलेली असताना तर आपण नक्कीच कुळवाडी भूषण असलेल्या आपल्या राजाचे वारस म्हणून शोभतो का? हा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याला… Read more »

माधुरी दीक्षित

प्रिय माधुरी, तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. पण लग्न करायचं तर माधुरीशी हे मात्र मी तेंव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या वाटेवर वडाचं झाड होतं. आम्ही पाच सहा मित्र त्या झाडाच्या अंगाखांद्यावर वाढलो. शाळा सुटली रे सुटली की आम्ही त्या झाडावर… Read more »

आदेश भाउजी

भाउजी, आम्हा बायकांना थेट होम मिनिस्टर बनवणारे भाउजी. एरव्ही बायकांना मिनिस्टर व्हायची संधी किती मिळते? त्यातही होम मिनिस्टर. देशात असो किंवा राज्यात, बाकी मंत्रीपद बायकांना देतात. पण होम मिनिस्टर होणं सहसा कुठेच बायकांच्या वाट्याला येत नाही. ते बायकांचं काम नाही असा समज अजूनही आहे. खरतर स्त्रियांवरचे अत्याचार आणि गुन्ह्याचं प्रमाण बघता आपल्या देशात कायदा आणि… Read more »

एक चित्रकार

प्रिय मी एक चित्रकार आहे. पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना? हजारो कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या माणसाच्या खऱ्या गोष्टीबद्दल आपण विनोद करतो. आणि सिनेमाबद्दल… Read more »

अडीच अक्षरांची गोष्ट

अडीच अक्षरांची गोष्टअडीच अक्षरांची गोष्ट प्रेम किती पवित्र भावना आहे हे आपल्याला दाखवतं. आणि तेही एका वेगळ्याच जगात नेऊन. प्रदीप आवटे आपल्याला कधी जळगावच्या मुलाच्या प्रेमाची गोष्ट सांगतात. कधी थेट रोमानियाच्या नादियाची गोष्ट समोर आणतात. दक्षिणेतली अजरामर प्रेमकथा सांगतात पण सोबतच तिथल्या लोककथेच्या निमित्ताने स्त्रियांवर झालेला अन्यायही समोर आणतात. खरंतर हे सगळं तुम्ही उत्सुकतेने वाचणार आहात… Read more »

माणसे गेली कुठे?

माणसे गेली कुठे? लेनिन आपला कोण होता? हा एक प्रश्न सारखा विचारला जातोय.लेनिनचा पुतळा पाडल्याचं आपल्याला दु:ख का वाटावं?खरं तर आपण मुघल आले,इंग्रज आले तरी शांत राहिलो.ते आपले राजे बनून राहिले.कलकत्त्यात आले ना?आपलं काय जातं?राजस्थानला आले ना?आपण सुरक्षित आहोत ना…म्हणत आपले लोकं शांत राहिले.कारण एकच होतं.देश म्हणून आपल्याला जाणीवच नव्हती.देशावर आक्रमण झालंय असं काही तेव्हा… Read more »

Latest
  • नाम फाउंडेशन

    सत्तावीस मधून नऊ गेले तर उरले किती? या प्रश्नाचं उत्तर सगळेच शहाणे लोक अठरा देतील. पण असे खूप लोक आहेत जे सत्तावीस मधून नऊ गेले तर उत्तर शून्य येतं असं म्हणतात. वेडे वाटतील आपल्याला ते लोक. पण त्यांचं बरोबर आहे. कारण ते शेतकरी आहेत. सत्तावीस नक्षत्रं आहेत. त्यातले पावसाचे नऊ गेले तर त्यांच्या दृष्टीने शून्यच… Read more »

  • बेस्ट ऑफ गुलजार

      खयाल चलते है आगे आगे मै उनकी छांवमें चल रही हूं… न जाने किस मोमसे बनी हूं जो कतरा कतरा पिघल रही हुं मै सहमी रहती हूं नींदमें भी कही कोई ख्वाब डस न जाये….. मेरे सरहाने जलावो सपने मुझे जरासी तो नींद आये…. वादा मुझको इक नज्म का वादा है मिलेगी मुझको डूबती… Read more »

  • नेमाडे – बेस्ट पोएट्री

    कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील? कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील? फांद्यांनी भर उन्हात होकार दिले असंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील? आणि मी परत सगळं मागेन ते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_ नुसतच मानेनं सगळं ते परत देशील? तुझी हार गोंदणारणीकडून तुझ्या हातावर गोंदून घेईन. – भालचंद्र नेमाडे.

error: Content is protected !!