दया पवार पुरस्कार समारंभात सयाजी शिंदे यांच्याबद्दल

थोडीफार ओळख मिळाली त्याच माणसाच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रसंग. अशावेळी त्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांना कोण ओळखत नाही अशी घासून गुळगुळीत झालेली विधानंकरण्यात अर्थ नाही. दुर्दैवाने आपल्याकडे सेलिब्रिट सगळ्यांना माहित असतात. माणूस म्हणून त्यांची फार ओळख आपल्याला नसते. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल किंवा अपघातांबद्दल हळहळ व्यक्त करणारे खूप नामवंतआपल्याला ठाऊक आहेत. पण अपघात… Read more »

दाभोळकरांच्या मारेकऱ्यानो …

#जवाबदो दाभोळकरांच्या मारेकऱ्यानो,      माझी निश्चित खात्री आहे की तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. जर अभिमान वाटला असता तर तुम्ही उजळ माथ्याने फिरला असता. मला माहित आहे की तुमच्यामागे कुणी सच्चा भारतीय नाही. सच्चा भारतीय कधी निशस्त्र माणसावर वार करणार नाही. मला माहितीय तुमच्यासोबत कुणी चांगल्या मनाचा माणूस नाही. कारण माणुसकीवर श्रद्धा असलेल्या एका… Read more »

जय हिंद !

जय हिंद ! इंग्रजांनी जाहीर केलं १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य देणार. पण तेंव्हा आपले काही लोक म्हणाले म्हणे की तो दिवस अशुभ आहे. थोडं मागे पुढे करा. अशा प्रकारे नको त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झलक देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्याला दिसली. खरंतर स्वातंत्र्य मिळत असताना देशातल्या अनेक संस्थानिकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आपण एक राष्ट्र आहोत,… Read more »

प्रिय किशोर कुमार

प्रिय किशोर कुमार, खरंतर ज्याने आपलं नाव मनावर गोंदवून ठेवलंय त्याला काय लिहिणार? तुझी कित्येक गाणी काळजावर कोरून ठेवलीत. तुझ्या गाण्यांशी जोडलेले आठवणींचे असंख्य शिलालेख आजही जसेच्या तसे उभे राहतात डोळ्यासमोर. पल पल दिल के पास तुम रहती हो ऐकताना मन आजही तेवढच हळवं होतं. तू रात्र रात्र गप्पा मारणाऱ्या आम्हा चार पाच जणात कॉमन… Read more »

प्रिय मम्मी पप्पा 

प्रिय मम्मी पप्पा आज फर्स्ट टाईम तुम्हाला लेटर लिहितोय. तेही मराठीत. actuallly तुम्ही मला आई बाबा असं मराठीत बोलायची पण habit लावली नाही. मम्मा आणि पप्पा बोलायला शिकवलं. मी तेच म्हणतो. तरी ममा तू शेजारच्या आंटीला कम्प्लेंट करत होतीस की आजकालच्या मुलांना मराठी नीट येत नाही. माझी मिस्टेक काय हेच मला कळत नाही. तुम्ही जे शिकवलं… Read more »

father-and-son

आपल्या पिढीचे बाप…

आपल्या पिढीचे बाप… बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत. कारण कविता फालतू आहे असं चारचौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बापमाणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे जगलो गाव आणि शहरात आणि या सिनेमात प्रत्येक बापाचा रोल एकसारखाच लिहिलेला होता. पेपरात सातव्या पानावर आठव्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे, तो… Read more »

आपण महाराजांचे मावळे आहोत का?

आपण महाराजांचे मावळे आहोत का?                  आपण खूप कट्टर शिवभक्त असल्याचं सांगतो पण खरंच तसे आहोत का? आपण आपलं आपल्याला तपासून बघण्याची गरज निर्माण झालीय. शेतकऱ्याला संपावर जायची वेळ आलेली असताना तर आपण नक्कीच कुळवाडी भूषण असलेल्या आपल्या राजाचे वारस म्हणून शोभतो का? हा विचार केला पाहिजे. शेतकऱ्याला… Read more »

माधुरी दीक्षित

प्रिय माधुरी, तुझा तेजाब सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. शाळेत होतो मी. दहावी झाल्यावर सायन्स घ्यायचं का कॉमर्स हे सुद्धा ठरलं नव्हतं. पण लग्न करायचं तर माधुरीशी हे मात्र मी तेंव्हाच ठरवून टाकलं होतं. शाळेच्या वाटेवर वडाचं झाड होतं. आम्ही पाच सहा मित्र त्या झाडाच्या अंगाखांद्यावर वाढलो. शाळा सुटली रे सुटली की आम्ही त्या झाडावर… Read more »

आदेश भाउजी

भाउजी, आम्हा बायकांना थेट होम मिनिस्टर बनवणारे भाउजी. एरव्ही बायकांना मिनिस्टर व्हायची संधी किती मिळते? त्यातही होम मिनिस्टर. देशात असो किंवा राज्यात, बाकी मंत्रीपद बायकांना देतात. पण होम मिनिस्टर होणं सहसा कुठेच बायकांच्या वाट्याला येत नाही. ते बायकांचं काम नाही असा समज अजूनही आहे. खरतर स्त्रियांवरचे अत्याचार आणि गुन्ह्याचं प्रमाण बघता आपल्या देशात कायदा आणि… Read more »

एक चित्रकार

प्रिय मी एक चित्रकार आहे. पण मी काही माझ्या चित्रांबद्दल सांगण्यासाठी लिहितोय असं नाही. एकूण आज समाजात जे चित्र आहे त्याविषयी थोडं बोलायचं होतं. आज एखादी कलाकृती लोकांसमोर आणायची म्हणजे धडकीच भरते कलाकाराला. कुणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना? हजारो कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या माणसाच्या खऱ्या गोष्टीबद्दल आपण विनोद करतो. आणि सिनेमाबद्दल… Read more »

Latest
  • Arvind Jagtap Letter To Dattu Bhoknal

    ऑलम्पिक मेडल

    असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आहे तर पाणी आहे. पण आपल्याला ते खोटं आहे असं वाटायला लागलंय अशी पाणीटंचाई आहे. आपल्याकडे हजारो गावं अशी आहेत ज्यांनी पावसाची वाट पाहणं कधीच सोडून दिलंय. ते फक्त tanker चीच वाट बघत असतात. अशाच एका तळेगाव नावाच्या गावातला तरुण दत्तू भोकनल. नाशिक मधल्या चांदवडजवळचं गाव. वडील कुटुंब… Read more »

  • गॉडफादर

    घर घेतलं होतं नवीन. उंच ईमारतीत. आनंदाने आईला आणलं दाखवायला. खालून दाखवलं. म्हणालो तो बघ त्या तिथे राहतो. आई म्हणाली, एवढ उंच राहत्यात का? एखाद दिवशी विमान येऊन ठोसला दिला मग कळल. त्या आठव्या मजल्यावरून मी क्षणात जमिनीवर आलो. माझ्या लक्षात आलं  मी नेहमी जमिनीवर असण्याचं कारण हेच तर आहे. परवा तुंबाराचं प्रकाशन झालं. आपण… Read more »

error: Content is protected !!