पानिपतचा पराभव

प्रिय सर्वपक्षीय आमदार साहेब, नमस्कार. सुटलो एकदाचे. राजकारणामुळे गेला महिनाभर राज्याला जवळपास व्हेंटिलेटरवर असल्यासारखं वाटत होतं. जे जिंकले त्यांना मनापासून शुभेच्छा. जे हरले त्यांना पुढच्यावेळीसाठी शुभेच्छा. तुम्हाला खरच सांगतो आमदारसाहेब पहिल्यांदा तुमच्यामुळे लोनचे हप्ते विसरलो. लोकलमधली गर्दी विसरलो. रस्त्यावरचे खड्डे विसरलो. महिनाभर फक्त कुठला पक्ष काय करणार, कुठला नेता काय डाव टाकणार एवढ्या एकाच विषयावर… Read more »

प्रिय टीव्ही 

प्रिय टीव्ही                 आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टीव्ही आल्यापासून लोकांनी विचार करणच सोडून दिलं. कमी केलं. काही ठिकाणी असं घडत असेल. पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट विधान करण्यात आघाडीवर असतो. असो. टीव्ही असतो हे ऐकून होतो. त्यात माणसं दिसतात हे… Read more »

प्रिय सचिन

प्रिय सचिन खरंतर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी होते जेंव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा होती. पाकिस्तानचा अब्दुल कादिर तुला म्हणाला की नव्या बॉलरला काय मारतोस? मला मारून दाखव. आणि अब्दुल कादिरच्या पुढच्या ओव्हरमध्ये तू चार सिक्स… Read more »

गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.

गोष्टी मतदानाच्या. एकेकाचं मत.

ती – अहो काय चाललंय हे? तो – जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचं मतदान चालू आहे. गेले चार महिने बोंबा मारताहेत सगळे. तरी तुम्ही विचारताय काय चाललंय हे… ती – तस नाही हो. पण माझं मतदार यादीत नावच नाही. तो – काय सांगता? कमाल आहे. ती – अहो जाताय कुठे? खरच नाव नाही माझं. तो –… Read more »

पाणी फाऊंडेशनची गोष्ट

प्रिय महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या इतर अनेक गावासारख्याच एका गावाची ही गोष्ट. कधीकाळी आपल्या शेतातल्या भरघोस पिकावर पाखरं येऊ नयेत म्हणून बुजगावणं उभं करायचे लोक. पण गेल्या काही वर्षात गावात बुजगावणं सुद्धा नजरेस पडत नाही. माणसं निघून जातात दुसऱ्यांच्या शेतातला उस तोडायला. गावची वेस ओलांडून जायला फुरसत नव्हती एके काळी. आणि गेल्या काही वर्षात शेकडो किलोमीटर दूर… Read more »

पत्रास कारण की

पत्रास कारण की पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं आलं की किती आनंद व्हायचा.लहानपणी खूप नातेवाईकांना, शेजार्यांना पत्र लिहून द्यायचो. आता चला हवा येऊ द्या मध्ये पत्र लिहितो. खरंतर एक पत्र लिहून बघू म्हणून सुरुवात झाली होती. पण हळू हळू चला हवा येऊ द्या मध्ये सारखं पत्र… Read more »

बोलतो मराठी..?

मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. २७ फेब्रुवारी. एक दिवस आधी म्हणजे २६ फेब्रुवारीला असते सावरकरांची पुण्यतिथी. मराठी भाषेला शेकडो पर्यायी शब्द तयार करून देणारे सावरकर. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी मनामनात रुजवलेली आपली मराठी भाषा. आज एवढ्या वर्षानंतरही तुकारामांचं एकतरी वाक्य लोक रोज बोलतात. कळत नकळत. मराठी भाषा टिकली… Read more »

हिरो व्हायचंय का?

चित्रपटात काम करायचं हे स्वप्न करोडो तरुण तरूणींचं असतं. डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय असं सांगत असले तरी खूप लोक मनातल्या मनात स्वतःला शाहरुख किंवा करीना कपूरच्या जागी बघत असतात. गाणी कानाने ऐकत असतात. मनात मात्र स्वतः पडद्यावर नाचत असतात. यात चूक काहीच नाही. प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे. पण या हिरो होण्याच्या नादात हजारो… Read more »

मी आनंदीबाई जोशी

सप्रेम नमस्कार! मी आनंदीबाई जोशी. सामान्य ज्ञानासाठी पहिली महिला डॉक्टर कोण असं विचारतात तेंव्हा माझं नाव पाठ करून ठेवतात बरेच लोक. जनरल नॉलेजचा भाग म्हणून का असेना माझ्यासारखे बरेच लोक लक्षात आहेत अजून तुमच्या. पण खर सांगू? मला तुम्ही जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा माझी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीत तर आवडेल मला. दीडशे वर्ष होत… Read more »

तु हि रे

चित्रपट लिहिता लिहिता किंवा या क्षेत्रात काम करता करता एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला या क्षेत्रात अजून खूप काही शिकावं लागेल. कारण हे वेगाने बदलत जाणारं माध्यम आहे. नव्या पिढीची भाषा वेगात बदलतेय. जुन्या चित्रपटांचे संवाद आणि आजच्या चित्रपटांचे संवाद यात किती फरक पडलाय ते आपण बघतोच. लेखक म्हणून सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे…. Read more »

Latest
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी!

    आपण लेखक कसे काय झालो? या प्रश्नाचं उत्तर कुणाला सहजा सहजी देता येत नाही. माझ्याबाबतीत तर लोक म्हणतात म्हणून आपण लेखक अशी परिस्थिती आहे. आपण लेखक आहोत असं आपण कसं समजायचं? केवळ कागद काळे करतो किंवा टायपिंग येते म्हणून? डॉक्टर, इंजिनियरला डिग्री मिळते आणि ठरतं की ते आता डॉक्टर किंवा इंजिनियर. लेखकांचं तसं नसतं. ते… Read more »

  • गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा!

         खरंतर दहावी अकरावीत लिहायला लागलो तेंव्हा पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढच स्वप्न होतं. अजूनही वर्तमानपत्रात काही छापून आलं की भारी वाटतं. पाहिळ्यापासून पत्रकार व्हायचं स्वप्न होतं. ते काही होता आलं नाही. पण पत्रकारासारखं जगायची सवय लागली. फिरायचं, लोकांशी बोलायचं, वेगळा angle शोधायचा प्रयत्न करायचा. ही सवय तशी खूप कामी आली. सुरुवातीला मराठवाडा नावाच्या दैनिकासाठी लिहायचो… Read more »

  • प्रिय २०१९

    प्रि­य २०१९ मला वाटलं येतं का नाही यंदा नवीन वर्ष? २०१८ तसं लईच लांबलचक गेलं. हनुमानाच्या शेपटीसारखं. हनुमान कोणत्या जातीचा ते काही अठरात समजलं नाही. आता एकोणीसमधीच कळल कायकी. एकोणीस आल्याव एकच टेन्शन आलं. आमच्याकड आर्धे दोस्त एकोनावीस म्हनतेत. त्यातले आर्धे आता पुण्यात आसतेत. त्यांचा आता वर्षभर पानउतारा व्हनार. आमचे मास्तरच एकोनावीस म्हणायचे त्याच्यामूळ आम्हाला… Read more »

error: Content is protected !!