देव चोरला माझा

December 4, 2016

लेखन

arvind jagapat patra

देव चोरला माझा

देव चोरला माझा
देव चोरला
भला थोरला माझा
देव चोरला

झगमग पाहुनिया
पाठ फिरवून गेला,
रोषणाई मधे देव
माझा हरवून गेला.
नाही उरली भक्ती
भाव नाही उरला
देव चोरला माझा
देव चोरला

हरवून गेले संत
काल उरलेले थोडे,
पावलांचे नसे मोल
आज महागले जोडे.
टेकू चरणी माथा
असा कोण उरला
देव चोरला माझा
देव चोरला

गीतअरविंद जगताप.
संगीतअवधूत गुप्ते.
चित्रपटमोरया.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *