म्हातारं

October 8, 2016

लेखन

arvind jagapat patra

म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं

म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं
म्हातारं येणार्या जाणार्याकडं डोळे फाडून बघतं
म्हातारं कामवालीसोबत गुलुगुलू बोलत बसतं
म्हातारं मुद्दाम मळकट कपडे घालतं
म्हातारं रात्रभर कानात शिरुन खोकत रहातं
म्हातार्यानं घराचा नरक बनवलाय सगळा
मेलो रेमेलो रे…’ म्हणतं पण म्हातारं मरतही नाही

ऐकता ऐकता
शेवटी एकदाचं मरुन गेलं म्हातारं

खुप चांगले होते
गिरणीवरुन दळूण आणायचे
कामवालीकडून चांगलं काम करुन घ्यायचे
साधेपणानं रहायचे
मुलांना खाऊ घालायचे
ते होते तोवर घराला कुलूप लावावं लागलं नाही कधी
म्हातारं माणूस असलं पाहिजे घरात, घराला आशिर्वाद मिळत राहातात

ऐकण्यासाठी
आता जिवंत नाहीय म्हातारं

<strong>मुळ कविताविनय विश्वास</strong>
<strong>अनुवादपृथ्वीराज तौर</strong>

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *