• ओळख
  • लेखन
  • पत्र
  • कविता
  • अल्बम
  • सिनेमा / पुस्तक
  • गाठभेट
  • ओळख
  • लेखन
  • पत्र
  • कविता
  • अल्बम
  • सिनेमा / पुस्तक
  • आवडलेलं
  • गाठभेट

फक्त तुझ्यासाठी...

  • फक्त तुझ्यासाठी...

    प्रकाशनाची तारीख 28-Jul-2020
    प्रकाशनाची तारीख 28-Jul-2020

    ती – हलो..

    ती – अग कुठेयस तू? फोन का उचलत नाहीस?

    ती – [ शांत ]

    ती – काय झालं चिऊ?

    ती – तू मला चिऊ म्हणू नकोस. मी काही चिमणी नाही.

    तो – अरे आधी तर आवडायचं तुला.

    ती – आधीची गोष्ट वेगळी आहे. तेंव्हा मला अक्कल नव्हती.

    तो – आता तुला फार अक्कल आलीय असं म्हणायचंय का तुला?

    ती – फालतू विनोद करू नकोस. आधी मी पण तुला पिलू म्हणायचे. पण तेंव्हा तू मला हम आपके है कौन मधलं टफी वाटायचास. पण आता शेजारच्या गल्लीतला मोती वाटतोस. सतत भुंकणारा.

    तो – अग काय झालंय काय तुला? मी तुला भुंकणारा वाटतो?

    ती – नाहीतर काय? परवा मी एवढ्या महागाची लिपस्टिक लावून आले आणि तू म्हणालास ओठ उललेत तुझे. लीप बाम लाव.

    तो – अरे मला खरच तसं वाटलं. आणि तुला माहितीय तशीही मला डार्क लिपस्टिक आवडत नाही. एखाद्या कागदावर सही करण्याऐवजी निरक्षर माणसाने अंगठा लावला की कसं वाटतं? सेम तसं वाटतं तू डार्क लिपस्टिक लावल्यावर.

    ती – हेच..हेच. आपल्या जगण्याविषयीच्या कल्पना वेगळ्या आहेत. आपल्यात खूप मतभेद आहेत.

    तो – पण लिपस्टिक ही काही जगण्याची कल्पना वाटत नाही मला. बघण्याची असू शकते फार फार तर.

    ती – पुन्हा पांचट विनोद. तुझ्या या विनोदांचा कंटाळा आलाय मला.

    तो – पण हेच विनोद तुला आधी खूप आवडायचे. माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप भारी आहे असं म्हणायचीस तू.

    ती – पण आता तो वाईट होत चाललाय. आता तुला साध्या चपलेने नाही, हाय हिल्सने मारावं वाटतं मला.

    तो – अग पण मी काय केलंय असं?

    ती – परवा मी तुला कीस पाठव असं म्हणाले तर तू के आय डबल एस असं टाईप करून पाठवलंस. माझ्या भावनेचा एवढा अपमान केला नव्हता कुणी.

    तो – अग रोज रोज ते स्माईली पाठवून कंटाळा आला होता. म्हणून फोर अ चेंज टाईप केलं. आणि आधी दोन महिने मी तुला कीस पाठव म्हणून विनंती केली होती. एकदा तरी ऐकलंस? एकदा तर म्हणालीस कधी कीस न भेटल्यासारखा काय वागतोस? म्हणजे तुला जणू काही सकाळ दुपार संध्याकाळ कीस येतात. गिफ्ट.

    ती - हा असा तू संशय घेतोस. अरे मी तुला म्हणाले होते की तू आता मोठा झालास. कीससाठी काय भांडतोस?

    तो – हे बघ तू नेहमी असं गोंधळात टाकणारं बोलतेस. आणि मी थेट मुद्द्यावर आलो की माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ लावलास असं म्हणतेस. मी असं म्हणालेच नव्हते असं एखाद्या राजकीय नेत्यासारख बोलतेस.

    ती – पण मी एवढच म्हणाले होते की आपण आता मोबाईलवर कीस पाठव म्हणून भांडायला लहान नाही राहिलो.

    तो – पण तुला काय वाटतं कीस म्हणजे मतदानाचा हक्क आहे का? १८ वर्ष झाले की आपोआप भेटतो. काही लोकांना लागतो उशीर. असत एखाद्याचं.

    ती – पण तुला प्रत्येक गोष्टीत उशीर लागतो.

    तो – तू ही अशी माझ्याबद्दल संशय उत्पन्न करणारी वाक्य चार चौघात बोलतेस. तू पूर्ण वाक्यात का बोलत नाहीस?

    ती – साधी गोष्टय. आपली पहिली भेट कॉलेजच्या पिकनिकला झाली होती. पिकनिक दोन दिवसांची आणि तू मला प्रपोज करायला तीन दिवस लावलेस. दोन दिवस वाया घालवले एवढे छान निसर्गाच्या सहवासातले.

    तो – आता मला काय माहित होतं तू बघताक्षणीच माझ्या प्रेमात पडली होतीस ते.

    ती – तसं काही नव्हतं. पण प्रपोज करायचं होतं तर थोडं आधी करायचं. मी नेहमी तुला चार स्माईली पाठवायचे आणि तू एक. मी तुझ्या चोवीस पैकी चोवीस प्रोफाईल पिक्सला लाईक केलंय सहा महिन्यात. आणि तू माझ्या २५७ पैकी फक्त २०३ प्रोफाईल पिक्सला लाईक केलंस. हे तुझं प्रेम?

    तो – आपलं अफेअर सुरु होऊन फक्त सहा महिने झालेत. सहा महिन्यात फार फारतर १८० दिवस असतात. १८० दिवसात तू २५७ प्रोफाईल फोटो टाकलेस. कशा कशाला लाईक करू मी?

    ती – मी असा नाक ओठावर घेऊन पाउट केलेला फोटो फक्त तुझ्यासाठी टाकला होता. त्याच्यावर साधी कमेंट पण केली नाहीस तू.

    तो – अग पण तू बाकी असे असे असे ५६ पाउट टाकलेस ते नेमके कुणासाठी होते मग?

    ती – पुन्हा संशय?किती संशयी स्वभाव आहे तुझा.

    तो – अग हे तूच सांगितलंस. आणि तुझा स्वभाव काय कमी संशयी आहे? एक दिवस मी रात्री बारा वाजता ऑनलाईन होतो तर केवढ्या शंका आल्या होत्या तुला. कुणाशी बोलत होतास म्हणालीस. तिकडे अमेरिकेत माझा भाऊ असतो हे सांगून पण पटत नव्हतं तुला. शेवटी तुझं बोलणं करून द्यावं लागलं त्याच्याशी.

    ती – काय फरक पडतो मग?

    तो – अग त्याला काय वाटलं असेल? किती हसला असेल तो माझ्यावर?

    ती – असं काही नाही. तो एकदम सिम्पल आहे. आणि खूप मॉड विचारांचा आहे.

    तो – मला माहितीय तो कसा आहे. तिकडे अमेरिकेत मांजर आडवी गेली तरी रस्ता बदलतो तो.

    ती – काहीपण खोटं बोलू नकोस. तिकडे मांजरी अशा रस्त्यावर आडव्या जात नाहीत.

    तो – मग तुला काय वाटतं तिकडे अमेरिकेत विमानं जातात रस्त्यावरून? आग माझा चुलत भाऊ आहे. मला माहितीय जास्त. अजूनही आम्ही बिअर प्यायला बसलो तर बिअरच्या ग्लासमध्ये असं बचकन बोट बुडवून दोन थेंब मित्रांच्या नावे हवेत उडवल्याशिवाय पीत नाही तो.

    ती – तुझी खोटं बोलायची सवय अजून गेली नाही म्हणजे.

    तो – मी खोटं बोलतो असं वाटतं तुला?

    ती – हो. तुझा चुलत भाऊ गेले चार दिवस इथे आलाय. दोन दिवस आम्ही बिअर पितोय. त्याने एकदाही बिअर मध्ये तू म्हणतो तसं बचकन बोट बुडवलेलं नाही.

    तो – सम्या भारतात आलाय.

    ती – हो आणि आता परत जातोय. त्याला बाय करायला आलेय मी एअरपोर्टला.

    तो – पण तो..तू...म्हणजे..तुम्ही...पण ...

    ती – आम्ही लग्न करणार आहोत पुढच्या वर्षी. त्या दिवशी तू रात्री का ऑनलाईन होतास ते त्यानी मला एवढ छान समजवून सांगितलं की मी...

    तो – अग खोटं बोलतोय तो. मी तुला शप्पथ घेऊन सांगतो त्या रात्री मी त्याच्यासोबत बोलतच नव्हतो.

    ती – तेच सांगितलं त्याने मला. त्याची जेन्युईनीटी एवढी आवडली मला की त्याचक्षणी मी ठरवलं. हाच माझं भविष्य.

    तो – हे फायनल आहे?

    ती – हे बघ बी positive. उगीच निगेटिव्ह विचार करू नकोस. अजून तुझ्यासमोर खूप मोठं आयुष्य आहे.

    तो – तू माझं काउन्सिलिंग करू नको. हे फायनल आहे का? आपलं ब्रेक अप?

    ती – हो.

    [ निराश होतो. फोन कट करतो. काही क्षण शांत. फोन लावतो पुन्हा. ]

    तो – हलो नेहा. गेली एकदाची कटकट. फायनली मी तिला नाही म्हणून सांगितलं. ...हो ... फक्त तुझ्यासाठी.

    Illustration © Vimal 

    Photo © Anil

comments

Prabhanjan Ramdas

खूपच छान . मजा आली

Rani Waghamare Thombare

वास्तव कल्पनेपेक्षा भयान आहे.हो तेच हे प्रेम आहे.👌👌👌🍁

Worship Salunke

अरे वाह फारच छान..विनोद पण वाटला आणि अस वाटला कदाचित तो तिच्या आठवणीत गुंतूनराहील पण शेवट तर वाचकाच्या विचारांपेक्षा फारच वेगळा निघाला ..खूप छान लिहलय..

ashu waghmare

हो दादा खरंच काही लोकांची प्रेमाची परिभाषाच बदलून गेली आहे ...खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे यात काही शंका च नाही ,खूप वास्तववादी... सगळं खूप प्रॅक्टिकल होऊन बसलंय याचीच खंत वाटते.

पुस्तकासाठी संपर्क

  • "गोष्ट छोटी डोंगरा ऐवढी" येत आहे पाचवी आवृत्ती

अल्बम

नुकतेच काही सुचलेले

  • प्रिय पंकजाताई, रोहितदादा, सुजयदादा

    16-Dec-2020
  • देव चोरला

    13-Jan-2021
  • नाना पाटेकर आणि चला हवा येवू दया

    01-Jan-2017
  • ऑलम्पिक मेडल

    16-Aug-2016

आमच्याशी संपर्क साधा

  • @arvindj3

    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • Youtube

    @2020 - All Right Reserved. Designed and Developed by arvindjagtap.com


    Back To Top
    • Home
    • About me
    • Privacy Policy
    • Contact Me

    Popular Posts

    • 1

      Memories from Last Summer

      June 7, 2017
    • 2

      Visit Orange Garden

      June 3, 2017
    • 3

      Explore Vancouver Mountain

      June 1, 2017
    • 4

      Hipster Outfit for Autumn

      May 29, 2017
    • 5

      Run into the Wood

      June 27, 2017
    @2020 - All Right Reserved. Designed and Developed by PenciDesign